Type Here to Get Search Results !

राहुरी - मावा बनविणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोघेजण गजाआड.

 मावा बनविणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, दोघेजण गजाआड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामध्ये गेल्या दोन वर्षा पासून सुरू असलेल्या मावा बनवणाऱ्या अड्ड्यावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत मावा तयार होत असलेला ठिकाणी धडक कारवाई करून दोघांना गजाआड केले तर तब्बल दीड लाख रुपयाचा मुद्देमाल व मावा बनवणारे साहित्य जप्त केले आहे.


या कारवाईमुळे वांबोरी सह राहुरी तालुक्यातील मावा बनवणाऱ्या व मावा विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील लोहार गल्ली येथे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारत राहुल सुगंध व तात्याबा धनवडे या दोघांना गजाआड केले. 


तसेच त्यांच्याकडून तब्बल दीड लाख रुपयाचे मुद्देमाल व साहित्य जप्त केले. या घटने बाबत राहुरी पोलिसात हवालदार शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रमेश सुगंध, वय ४२ वर्षे, राहणार लोहर गल्ली वांबोरी, ता. राहुरी व तात्याबा लक्ष्मण धनवडे, वय ३४ वर्षे, रा. हनुमान नगर, वांबोरी, ता. राहुरी.


या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५७५/२०२३ भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.