Type Here to Get Search Results !

राहुरी - घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपए आणावेत म्हणून विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ.

 घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपए आणावेत म्हणून विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


माहेरहून तीन लाख रूपए आणण्यास नकार दिला. तसेच पतीला पर स्त्री बरोबर फिरण्यास विरोध केला असता सासरच्या लोकांनी तब्बू शेख या विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ करुन तीला माहेरी पाठवून दिले. ता बाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


तब्बु चाॅद शेख, वय २३ वर्षे, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर. हल्ली रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी. या तरूणीचे लग्न दिनांक २१ मार्च २०२१ रोजी चाॅद पापामिय शेख रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर. यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर सासरच्या लोकांनी तीन महीने तब्बू शेख हिला चांगले नांदवले. त्यानंतर ते कोणत्या ना कोणत्या कारणा वरुन तब्बू शेख हिला मानसिक व शारीरीक त्रास देऊन मारहान करु लागले. 


त्यानंतर तीचा पती तीला म्हणाला की, आपले घर पडले आहे. आपल्याला नविन घर बांधण्यासाठी तू तुझ्या माहेरहून वडीलांकडुन तीन लाख रुपये घेऊन ये. या कारणावरून सासरचे लोकांनी तब्बू शेख हिला मारहाण करून तीचा शारीरीक व मानसिक छळ केला. त्यानंतर तब्बू शेख हिचा पती त्यांच्या शेजारी राहणारी त्याची आतेबहीन जानम गुलाब शेख हिच्या सोबत फिरु लागला. 


तेव्हा तब्बू शेख पतीला म्हणाली की, तुम्ही तिच्या सोबत फिरु नका. मी तुमची पत्नी आहे. तेव्हा पती म्हणाला की, मी जानम सोबत लग्न करणार आहे. म्हणुन तब्बू हिने जानमला सांगितले की, तु माझ्या पती सोबत फिरु नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने जानमने व पतीने तब्बूला मारहान केली. 


त्यानंतर वारंवार घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपए आणावेत. यासाठी सासरच्या लोकांनी तब्बू शेख हिचा शारिरीक व मानसिक छळ करुन तीला माहेरी पाठवुन दिले. घटनेनंतर तब्बू चाॅद शेख हिने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


तीच्या फिर्यादीवरून १) पती- चाॅद पापामिया शेख, २) सासरे- पापामिया मिरासाहेब शेख, ३) सासु- यास्मीन पापामिया शेख, ४) पतीची आतेबहीन- जानम गुलाब शेख, सर्व रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ५८२/२०२३ भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शारिरीक व मानसिक छळ करून जिवंत मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.