आर. पी. आय. च्या जिल्हा सरचिटणीस पदी सिद्धांत सगळगिळे यांची निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या उत्तर अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी आजपर्यंत पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या व तालुक्यातील जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत ठेवण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे पत्रकार सिद्धांत सगळगिळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशन संदर्भात राहुरी फॅक्टरी येथे नियोजन बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटक गोविंद दिवे हे होते. सिद्धांत सगळगिळे यांच्या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली. जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, प्रवीण लोखंडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी सिद्धांत सगळगिळे यांनी सांगितले कि, यापुढील काळात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वखाली गाव तेथे शाखा यावर भर देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्षाशी जोडण्याचे काम करणार असून संघटन जास्तीत जास्त कसे वाढेल, यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, विभागीय जिल्हा प्रमुख भीमा बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, प्रवीण लोखंडे, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप भोसले, जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश चक्रे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, मुस्लिम आघाडीचे अय्युब पठाण, महिला जिल्हाध्यक्षा सिमा बोरुडे, तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे, निशिकांत सगळगिळे, प्रशांत सगळगिळे, निशांत सगळगिळे, सोमा भागवत, माऊली भागवत, किशोर पंडित, मयूर कदम, सुरेंद्र सांगळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
