सामाजिक बांधिलकी जपत नूतन मराठी शाळा नं.10 सरोदेवस्ती शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप
सामाजिक बांधिलकी जपत कै.अंबादास पतंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नूतन मराठी शाळा नं.10,सरोदेवस्ती येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य मोफत वाटण्यात आले. तर इतर मुलांनाही सुट्टीतील अभ्यास जेव्हढा पूर्ण केला त्याप्रमाणे बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्व मिळून सुमारे साडेतीन ते चार हजार रुपयाचे साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास राहुरीचे गटशिक्षणाधिकारी श्री.गारूडकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरातील श्री.भास्कर मंचरे,श्री.सचिन उंडे,शाळेचे माजी विद्यार्थी GE एरोस्पेस कंपनीत ज्युनिअर इंजिनियर असलेले श्री. दिपक सूर्यवंशी,सौ.वैशाली वराळे,सौ.ललिता वराळे,सौ.घोरपडे,सौ.नंदा खीलारी,सौ.अर्चना रेलकर , श्रीम. कमल पतंगे,श्री.उजागरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी सौ.पतंगे मॅडम ,सौ. एळवंडे मॅडम यांनी परिश्रम घेतले .



