Type Here to Get Search Results !

राहुरी - जागतिक ऑलिम्पिक दीना निमित्त राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडूंचा सत्कार.

 जागतिक ऑलिम्पिक दीना निमित्त राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडूंचा सत्कार.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील लोकनेते रामदास पा. धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कु. एकता कुलकर्णी हिची जलतरण क्रिडा प्रकारात  दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याच प्रमाणे कु. संसारे कावेरी बाळासाहेब हिची शूटिंगबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी वाराणसी येथे निवड झाली होती. या दोन्हीही खेळाडूंने सदर स्पर्धेत महाराष्ट्रlचे प्रतिनिधित्व केले. 


या गुणवंत खेळाडूंना डॉ.बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक खासदार डॉ.सुजय विखे, मा. चेअरमन नामदेव ढोकणे, सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, प्राचार्य डॉ. वेताळ तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मंजाबापू उर्‍हे, पर्यवेक्षक राजेंद्र कोहोक, वरिष्ठ लिपीक लांबे, प्रशासकीय अधिकारी सैंदाने व जलतरण मार्गदर्शक गणेश कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. तिला कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संतोष रामदास बर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.