महिलांनी दारू अड्ड्यावर छापा टाकून दारू जप्त केली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील आरडगाव गावात दारूबंदीचा ठराव करूनही मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू आहे. दारू अड्ड्यांचा बंदोबस्त होण्यासाठी अनिता जगधने यांनी सर्व महिलांना घेवून दारू अड्यावर नजरा ठेवून चौका चौकात महीला उभ्या केल्या. ओढ्यात काट्यात दारू विकत असल्याचे कळाले सर्व महिलांनी ओढ्याकडे मोर्चा वळवला. ही माहीती दारूड्यांना कळाल्यावर त्यानी दारूचा बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून काट्या काट्याने पळत सुटले.
आरडगाव गावामध्ये अवैध धंदेवाल्यांनी कहर केला असुन या दारूमुळे अनेक गोरगरीब महीलांचे संसार उद्ध्वस्त होवून संसाराची राख रांगोळी झाली आहेत. हे सर्व धंदे बंद होण्यासाठी अनिता जगधने यांनी पुढाकार घेऊन सर्व वंचित, कष्टकरी, पिडीत महीलांना घेवून सरपंच सुरेखा रविंद्र म्हसे ग्रामसेवक यांच्या समोर कथन करून लगेच ग्रामपंचायतीचा दारूबंदी ठराव घेवून सरपंचासह राहुरी पोलीस स्टेशन गाठले.
संबंधित पोलीस अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. परंतु निवेदन देवूनही पोलीस अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ऊलट दारूधंदे चालूच होते. हे पाहून अनिता जगधने या महिलेने पुढाकार घेऊन दारू अड्डे बंद करण्यासाठी यांनी सर्व महिलांना घेवून दारू अड्यावर दारूड्यावर नजरा ठेवून चौका चौकात महीला उभ्या केल्या होत्या.
ही माहीती दारूड्यांना कळाली, त्यांनी दारूच्या बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून काट्या काट्याने पळत सुटले. यावेळी महिलाही हातात दंडूके घेवून त्यांच्या मागे पळत असल्याने रणरागिनींचा रूद्र औतार पाहून दारू धंदेवाल्यांची व दारूड्यांची पळताभुई थोडी झाली. काही धंदे वाले कड्याकुलपे लावून पळून गेली.
सदर दारूचा बॉक्स पकडल्या नंतर महीलांनी पोलीस पाटील जाधव व रविंद्र म्हसे यांना बोलावून पोलीसांना बोलवून घेण्यास सांगितले. तेव्हा चार दिवसांनी पोलीस आले. महीलांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीसांचीही भंबेरी उडाली.
अनिता जगधने यांनी ठणकावून सांगितले की, जर पोलीसांनी अवैध दारू बंद केली नाही व संबंधितावर कारवाई केली नाहीतर ह्याच दारूच्या बाटल्या पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या दालनात घेवून बसणार. आणि जो पर्यंत बिट हवालदारचे निलंबन होत नाही. तोपर्यंत तेथून ऊठणार नाही. आमच्या जिविताला काही बरेवाईट झाल्यास बिटचे हवालदार पोलीस यांना जबाबदार धरण्यात यावे. असे ठणकावून सांगितले.
यावेळी अनिता जगधने, वैशाली आव्हाड, नंदा माळी, कमल पवार, सिंधू बर्डे, उषा जाधव, सुरेखा थोरात, मिरा थोरात, पुष्पा आव्हाड, शांताबाई जाधव, द्वारकाबाई जाधव, मंगल जगधने, मनिषा जगधने, कुसुम जगधने या महीला यावेळी सहभागी झाले होत्या.
