शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा
शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्काराने मनुष्याचे शरीर निरोगी व बुद्धी शांत राहते असे प्रतिपादन योगशिक्षिका मीना येवले मॅडम यांनी केले.
विद्यालयात जागतिक योगा दिनानिमित्त योगा मीना येवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगा, सूर्यनमस्कार, व्यायाम याचे महत्त्व सांगितले व योगाचे अनेक प्रकार व त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी देखील प्राणायाम विविध असणे सूर्यनमस्कार याचे प्रात्यक्षिक केले, हा योग दिन साजरा करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जाधव व आभार सुजाता तारडे यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव मॅडम, पर्यवेक्षक अरुण खिलारी सर, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक अमोल गाडे, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते...


