Type Here to Get Search Results !

राहुरी - बस स्थानकाचा आराखडा व निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात - आ. प्राजक्त तनपूरे

 बस स्थानकाचा आराखडा व निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात - आ. प्राजक्त तनपूरे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी बस स्थानकाचा आराखडा व निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राहुरी बस स्थानकाची पुनर्बांधणी या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी काल प्राजक्त तनपूरे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य) विद्या भिलारकर यांची पुन्हा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.



 मागील बैठकीत नवीन बस स्थानकाचा आराखडा तयार करण्याच्या हट्टीने चर्चा झाली होती. बैठकीत बस स्थानकातील नियोजित १० प्लॅटफॉर्म शिवाय अधिकचे दोन ते तीन प्लॅटफॉर्म वाढविण्या बाबत चर्चा झाली. लवकरच सुधारित आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल.


 राहुरी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे रोज येथून राज्यभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यादृष्टीने भव्य आणि सुसज्ज बस स्थानक उभे राहावे. यासाठी प्रयत्नशील आहे. असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.