Type Here to Get Search Results !

घोडेगाव: आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

 आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा 



घोडेगाव: आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव यांच्या सहयोगाने राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर दिव्या पवार यांच्या मार्गदर्शनपर डॉक्टर मोहद अरबाज व त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगासने व प्राणायाम याची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले व म्हणाले "योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी ते गरजेचे आहे".

     तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका श्रीमती प्रज्ञा भेके मॅडम यांनी योग विषयी माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. 

     कलाशिक्षक श्री समीर मुजावर सर तसेच क्रीडा शिक्षक तानाजी फुलमाळी, ज्योती रोकडे, रोहित तळेकर व गणेश मडके यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शब्द हा विद्यार्थ्याच्या सहाय्याने बनविण्यात आला.

     आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे यांनी डॉक्टर दिव्या पवार मॅडम यांचे आभार मानले व आरोग्य विषयीचे असे विविध उपक्रम घेण्यात यावे असे सुचविले.

 आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष, खजिनदार श्री श्यामशेठ गंगाधरशेठ होनराव, कार्याध्यक्ष श्री राजेश कैलासशेठ काळे, मानद सचिव श्री अक्षय रामशेठ काळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चेअरमन श्री बाळासाहेब काशिनाथ काळे,  स्कूलच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, उपप्राचार्य रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.