Type Here to Get Search Results !

राहुरी - पती, पत्नी व मुलीला लाकडी दांडा, कोयता व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

 पती, पत्नी व मुलीला लाकडी दांडा, कोयता व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आमची जागा आम्हाला विकायची नाही त्यामुळे आमची जागा तुम्हाला देणार नाही असे म्हणाल्याचा राग आल्याने लाकडी दांडा, कोयता व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील कोमडवाडी येथे दिनांक १७ जून २०२३ रोजी घडलीय. 


विजय गुलाबराव वाघमारे, वय ४७ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील कोमडवाडी येथे राहत आहेत. दिनांक १७ जून २०२३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विजय वाघमारे हे त्यांच्या राहते घरासमोर होते. तेथे त्यांच्या घराशेजारी राहणारे शरद बबन ससाने व केशव बबन ससाने असे दारु पिऊन आले. आणि म्हणाले कि, तुमची जागा आम्हाला द्या.


तेव्हा विजय वाघमारे त्यांना म्हणाले की, आमची जागा आम्हाला विकायची नाही. त्यामुळे आमची जागा तुम्हाला देणार नाही. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी विजय वाघमारे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीला लाकडी दांडा, कोयता व लाथा बुक्कयानी मारहान केली.


 त्यावेळी तेथे आरोपी रुषिकेश विलास माने, रा. कोमडवाडी हा आला व तिघांनी वाघमारे यांना शिवीगाळ दमदाटी करुन जर आमचे नादी लागले तर एकएकाचा खुन करु. अशी धमकी दिली. तसेच त्यांच्या घराच्या खिडक्या व दरवाजा फोडुन नुकसान केले आहे.


घटनेनंतर विजय गुलाबराव वाघमारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या नूसार आरोपी शरद बबन ससाने, केशव बबन ससाने, रुषिकेश विलास माने, सर्व रा. कोमडवाडी, ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. ६५९/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.