Type Here to Get Search Results !

राहुरी - बाथरूमसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेले.

 बाथरूमसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बाथरूमसाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या एका गावत दिनांक १८ जून २०२३ रोजी घडलीय. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


या घटनेतील १६ वर्षे ५ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या एका गावात राहते. दिनांक १८ जून २०२३ रोजी दुपारी २.३० वाजे चे सुमारास पिडीत मुलगी तीच्या घरात होती. 


तेव्हा ती बाथरुमला चालले असे सांगुन ती तीच्या घरापासुन शेतात गेली. बराच वेळा झाला तरी ती घरी आली नाही. म्हणून तीच्या नातेवाईकांनी तिचा आजुबाजुला परिसरात व नातेवाईक यांचेकडे चौकशी केली. मात्र ती मिळुन आली नाही. 


पिडीत मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तीच्या आई वडीलांच्या कायदेशिर रखवालीतुन पळवुन नेले. पिडीत मुलीला राजु गुलाब बर्डे, रा. कामतवाडी, ता. पारनेर याने पळवुन नेले. असा तीच्या आई वडीलांना संशय आहे. 


घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी राजू गुलाब बर्डे, रा. कामतवाडी, ता. पारनेर याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ६६९/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.