Type Here to Get Search Results !

राहुरी - खोके घेऊन सत्तेत आलेले सरकार जनतेची दिशाभूल करत आहे- बाबासाहेब भिटे

 खोके घेऊन सत्तेत आलेले सरकार जनतेची दिशाभूल करत आहे- बाबासाहेब भिटे.



आमदार प्राजक्त तनपूरे यांनी विकास कामांना गती दिली- किसन जवरे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मनातलं महाविकास आघाडीच सरकार राज्यात चांगले काम करत असताना केवळ सत्तेच्या हव्यासापोटी 'खोके ' घेऊन सत्तेत आलेले सरकार जनतेची दिशाभूल करत असून विद्यमान सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामाला स्थगिती देण्याचे काम करत असल्याने हे केवळ स्थगिती सरकार असल्याचे घनाघाती टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी केले.


महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पुर्ण झाले. या निमित्ताने या सरकारचा निषेध म्हणून माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. ही रॅली राहुरी तालुक्यातील विविध गावांमधून मार्गक्रमण करीत वांबोरी येथील मार्केट कमिटीच्या गाळ्यांसमोर कॉर्नर सभे नंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे होते.


 याप्रसंगी तालुक्याचे युवक नेते सोहम प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन बाफना, वांबोरीचे माजी सरपंच किसन जवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन गोरक्षनाथ पवार, वांबोरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत नवले, बाळासाहेब लटके, भारत तारडे, बाळासाहेब खुळे, रामदास बाचकर, दत्तात्रय कवाने, रामदास बाचकर,


 किशोर हरिश्चंद्रे, शहाजी जाधव, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, प्रकाश भुजाडी, श्रीकांत बाचकर, सुजित वाबळे, राजेंद्र जाधव, गिरीश निमसे, मधुकर पवार, पांडू उदावंत, चंद्रकांत टेके, नरेंद्र शिंदे आयुब पठाण, प्रदीप पवार, रवींद्र आढाव, आदिनाथ तनपुरे, इंद्रभान पेरणे, पोपट देवकर आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना भिटे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकारमध्ये असलेले मंत्री केवळ पन्नास खोक्यांच्या मुळे गुहाटी मार्गे गोवा आणि मुंबईत आले व महाविकास आघाडी सरकार पाय उतार केले. यामुळे महाराष्ट्राचे मोठी हानी झाले असून काम करणार सर्वसामान्य जनतेला आधार देणार सरकार सत्तेतून बाहेर गेल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यमान भाजप सरकारचा निषेध केला असल्याचे यावेळी भिटे म्हणाले.


उपस्थितांना संबोधित करतांना किसन जवरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संपूर्ण मतदार संघातील शेतकऱ्यांच्या ओव्हरलोड डीपीवरील भार कमी करून नवीन डीपी बसवण्याचे काम तसेच परिसरातील रस्ते डांबरीकरण यासह पाणीपुरवठ्याच्या योजना यासारख्या अनेक कामांमध्ये प्राधान्य देऊन मतदार संघातील विकासाला गती देण्याचे काम मंत्री तनपुरे यांनी केले असे जवरे यांनी यावेळी सांगितले.