ऋषिकेश तारडे स्केटिंग अरेनाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कारसाठी निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार व मास्टर चंदगीरराम राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या वर्षी ऋषिकेश तारडे स्केटिंग अरेनाचे संचालक ऋषिकेश तारडे यांच्या सह एकूण ६ विद्यार्थी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
*तनिष्का अतुल तागड ( वय १० वर्ष इयत्ता ५ वी शाळा सौ. भागिरथीबाई तनपुरे कन्या माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राहुरी ), असित नितीन कांबळे ( वय ११ वर्ष इयत्ता ५ वी यांची मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारा साठी निवड झाली आहे.
तसेच त्यांचे प्रशिक्षक ऋषिकेश राजेंद्र तारडे हे सुद्धा मेजर ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सिद्धेश विरेशकुमार शेळके (वय १२ वर्ष, इयत्ता ७ वी शाळा मौर्य इंटरनॅशनल स्कूल, राहुरी), सृष्टी सचिन गुलदगड (वय ८ वर्ष, इयत्ता २ री शाळा सौ. भागिरथीबाई तनपूरे प्राथमिक विद्यालय राहुरी), सार्थक उत्तम बनसोडे (वय १२ वर्ष इयत्ता ६ वी शाळा अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, राहुरी) व सोहम संदीप शिरसाठ (वय १६ वर्ष इय्यता १० वी शाळा अष्टविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल) यांची मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वानवा असताना देखील ऋषिकेश तारडे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. योगायोग म्हणजे विद्यार्थ्यांन बरोबर प्रशिक्षकाची देखील पुरस्कारासाठी निवड झाल्या मुळे आनंद द्विगुणित झाला आहे.
पुरस्काराचे वितरण २१ ऑगस्ट रोजी क्रीडा दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी, प्रक्षिशकान सह पालकांचे देखील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
