रात्रीच्या दरम्यान घरात घुसून महिलेला मारहाण करत रोख रक्कमेसह दागीने पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील गंगापूर येथे दिनांक ३० मे २०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपींनी एका महिलेच्या घरात अनाधिकृत पणे प्रवेश केला. आणि तूझ्या नवऱ्याने आमच्या कडून घेतलेले पैसे का दिले नाही. असे म्हणून महिलेला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व रोख रक्कम घेऊन आरोपी जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.
वंदना बबन शेंडगे, वय ४० वर्षे, रा. गंगापुर, ता. राहुरी. या दिनांक ३० मे २०२३ रोजी रात्री ११ वाजे दरम्यान त्यांच्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या घरात अनाधिकृत पणे प्रवेश केला. म्हणाले की, तुइया नवऱ्याने घेतलेले पैसे का दिले नाहीत. असे म्हणून वंदना शेंडगे यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली.
तसेच त्यांच्या घरातील पेटी उघडुन त्यामध्ये ठेवलेले ९ हजार ७०० रुपये काढुन घेतले. आणि वंदना शेंडगे यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी मंगलसुत्र बळजबरीने तोडुन काढुन घेतले. त्यानंतर तू जर पोलीस स्टेशनला आमचे विरुध्द तक्रार दिली तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली.
त्यानंतर सर्व आरोपी रोख रक्कमेसह मुद्देमाल घेऊन तेथून निघून गेले. घटनेनंतर वंदना बबन शेंडगे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप दामोधर पगारे, अजय भास्कर पगारे, संदिप भास्कर पगारे, शिवाजी दामोधर पगारे, भास्कर दामोधर पगारे, बाळासाहेब शिवाजी पगारे, विकास बाळासाहेब पगारे, सर्व रा. गळनिंब ता. श्रीरामपुर.
या सात जणांवर गुन्हा रजि. नं. ५८९/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२७, ४५२, ५०४, ५०६, १४३, १४७ प्रमाणे चोरी, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस पोलिस करत आहे.
