चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन पर प्रांतीय तरूणांना पकडून येथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरात चोरीचा प्रयत्न करत असलेल्या दोन पर प्रांतीय भामट्यांना वाॅचमनच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ पकडण्यात यश आले. परिसरातील नागरिकांनी भामट्यांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना राहुरी शहर हद्दीत दिनांक १ जून २०२३ रोजी घडलीय.
राहुरी शहर हद्दीत सिध्दी विनायक कॉम्पलेक्स येथे रामदास भानुदास डाके, वय ५२ वर्षे, हे रात्रीच्या वेळी वाँचमन म्हणून काम करतात. दि. १ जून २०२३ रोजी पहाटे २ वाजे च्या सुमारास रामदास डाके हे कामावर असताना त्यांना शटर उघडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले कि, कोणीतरी अज्ञात इसमाने कॉम्पलेक्सचे शटर उघडुन चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रामदास डाके यांना पाहून भामट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामदास डाके यांनी आरडाओरडा केला. तेव्हा परीसरातील काही नागरीकांनी धाव घेऊन त्या दोन भामट्यांना पकडले. त्यांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
रामदास भानुदास डाके यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास कोटी व मलई कोटी, दोघे रा. मन्नमा, मध्ये प्रदेश. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५९२/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११ प्रमाणे चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले.
