Type Here to Get Search Results !

राहुरी - महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत मिठी मारून विनयभंग.

 महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत मिठी मारून विनयभंग.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


दुपारच्या दरम्यान एका ३४ वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने दोन आरोपी घूसले आणि महिलेला मिठी मारली. त्या नंतर तीला शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तीचे सोन्याचे दागीने घेऊन पसार झाले. ही घटना दिनांक १ जून २०२३ रोजी घडलीय. 


या घटनेतील एक ३४ वर्षीय महिला तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील मानोरी परिसरात राहते. दिनांक १ जून २०२३ रोजी दुपारच्या दरम्यान दोन आरोपी त्या महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेचा हाथ धरून तीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. 


तसेच तू पोलिसांकडे तक्रार केली तर तुला जीवे ठार मारू व तुझ्यावर ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करू. अशी धमकी दिली आहे. आणि जाताना आरोपींनी महिलेचे एक तोळा वजनाचे मनी मंगळसूत्र घेऊन गेले. घटनेनंतर त्या महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


तीच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र बाबुराव आढाव, राहणार खिळे वस्ती, मानोरी, ता. राहुरी व साईनाथ चंद्रभान पडवळ, राहणार वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५९५/२०२३ भादवी कलम ४५२, ३५४, ३२७, ५०४, ५०६ प्रमाणे जबरदस्ती घरात घुसून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शेख हे करीत आहेत.