Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयाची एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...

 शिवांकुर विद्यालयाची एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम... 




राहुरी तालुक्यातील शिवांकुर विद्यालय कोंढवड मधील विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

मार्च 2023 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण 35 विद्यार्थी बसले होते व सर्व 35 विद्यार्थी पास झाले त्यामध्ये विद्यालयातून प्रथम क्रमांक मिलिंद राजेंद्र लोखंडे 91.20% द्वितीय क्रमांक कृष्णा मनोज म्हसे 90.80% तृतीय क्रमांक आदिती संतोष म्हसे 81 टक्के गुण मिळवले तर उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.

विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, सविता गव्हाणे, विजय शिंदे, सचिन जाधव, शितल फाटक, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता डौले, किरण तारडे, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शारदा कोकाटे, पल्लवी भालदंड, मयूर धुमाळ, भाऊसाहेब करपे, अरुण खिलारी आदींनी मेहनत घेतली.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार विश्वस्त उत्तमराव पवार, भास्करराव पवार, मंगलताई पवार, डॉ किशोर पवार, सचिव डॉ प्रकाश पवार, डॉ नरेंद्र इंगळे, गणेश शेळके आदींनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.