Type Here to Get Search Results !

राहुरी - गाडगे महाराज आश्रम शाळेत सुशील सौदागर ७९.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम.

 गाडगे महाराज आश्रम शाळेत सुशील सौदागर ७९.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित श्री गाडगे महाराज प्राथमिक/ माध्यमिक आश्रम शाळा राहुरी इयत्ता दहावी बोर्ड शाळेचा परीक्षेचा निकाल ७९.३१ टक्के इतका लागला असून यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.


आश्रमशाळेच्या शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ चा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची असलेली परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थी परीक्षेत बसते होते. त्यामधून २३ विद्यार्थी पास झाले आहे.  

शाळेतील प्रथम 3 विद्यार्थी


 १) चि. सौदागर सुशील संजय 

एकूण गुण = ३९८ शेकडा गुण = ७९.६० %


 2) कु. तनया जॉन विधाते 

एकूण गुण= ३३१

शेकडा गुण = ६६.२० %


3) चि. भोसले विकास सुरेश 

 एकूण गुण= ३०७,

शेकडा गुण = ६१.४० %


या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मागदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन मधुसूदन मोहिते, सचिव सचिन घोंगटे व शाखेच्या संचालक भारती खिलारी, मुख्याध्यापक गुजरे सर, प्राथमिक मुख्याध्यापक उंडे सर तसेच सर्व विभागाचे अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.