Type Here to Get Search Results !

राहुरी - डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वराली वरकड तालूक्यात प्रथम क्रमांकावर.

 डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वराली वरकड तालूक्यात प्रथम क्रमांकावर.



स्वराली वरकड हिचे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील रहिवासी व डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी स्वराली अशोक वरकड इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून राहुरी तालुक्यात प्रथम व डिपॉल स्कुल मध्येही प्रथम येण्याचा बहुमान तीने मिळविला आहे.


तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत राहणारी स्वराली वरकड ही तनपुरे कारखाना कॉलनी परिसरात परीक्षा कालावधीत वीजपुरवठा खंडित असताना प्रचंड जिद्द व चिकाटीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेला सामोरे गेली.


निकाल जाहीर झाला असता तिला ९८.८० टक्के गुण मिळविले आहे. स्वराली हिने तालुक्यात व डिपॉल स्कुलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता पर्यंतचे रेकोर्ड मोडीत काढून सर्वाधिक गुण तिने मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल डिपॉल स्कुलचे फादर सॅन्टो, फादर जेम्स, मेघना गांडूळे आदींसह शिक्षक वृदांनी अभिनंदन केले.