Type Here to Get Search Results !

राहुरी - कै. लालाशेठ बिहाणी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल ८६.४७ टक्के.

 कै. लालाशेठ बिहाणी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल  ८६.४७ टक्के.



आशुतोष शिरसाठ  ९२.४० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी एज्युकेशन सोसायटी संचालित कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेचा इयत्ता दहावी बोर्ड शाळेचा परीक्षेचा निकाल  ८६.४७  टक्के इतका लागला असून यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.


विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ चा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची असलेली परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. शाळेतील एकूण २४४ विद्यार्थी परीक्षेत बसते होते त्यामधून २११ विद्यार्थी पास झाले आहे. आशुतोष विजय शिरसाठ याने ४६२ गुण  ९२.४० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आला. तनिष्का भरत परजणे हिने ४६१ गुण ९२.२० टक्के मिळवून द्वितीय, भव्य निलेश खाबिया याने ४६१ गुण ९२.४० टक्के मिळवून द्वितीय. स्वरूप आरती डोळस याने ४५४ गुण ९०.८१ टक्के मिळवून विद्यालयात तृतीय आला आहे.


या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मागदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रभावती सतीश बिहाणी, सचिव मनोज बिहाणी,  सहसचिव अनुप बिहाणी, मुख्याध्यापक कैलास अनाप, उप मुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे, पर्यवेक्षक रंगनाथ पवार यानी अभिनंदन केले आहे.