पोलिस पथकाचा मावा विक्रीच्या ठिकाणी छापा, मुद्देमालासह आरोपी ताब्यात.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे दिनांक १६ जून २०२३ रोजी पोलिस पथकाने मावा विक्री होत असलेल्या ठिकाणावर छापा टाकलाय. या कारवाईत पथकाने मावा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केलाय.
पोलिस नाईक सचिन विठ्ठल ताजणे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १६ जून २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी बस स्थानक समोर केंदळ रोड येथे एक इसम महाराष्ट्र शासनाची बंदी असलेली पान सुपारी हा अवैद्य रित्या त्याचे टपरी मध्ये मावा सुपारी विक्री करत आहे.
त्यानूसार सहाय्यक फौजदार चंद्रकांत बऱ्हाटे, पोलिस हवालदार ढाकणे, कदम आदि पोलिस पथकाने छापा टाकला. त्यावेळी एक इसम शनिराज पान टपरीच्या आडोशाला बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेतले व चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचे नाव राजेंद्र सुर्यभान बनसोडे, वय ४६ वर्षे, रा. धनगर गल्ली, ब्राम्हणी, ता. राहुरी. असे सांगीतले.
त्याची झडती घेतली असता सदर ठिकाणी ९०० रूपए किंमतीचा ५०० ग्रॅम मावा मिळून आला. पोलिस पथकाने मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र सुर्यभान बनसोडे, वय ४६ वर्षे, रा. धनगर गल्ली, ब्राम्हणी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ६५१/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
