Type Here to Get Search Results !

राहुरी - छतावरील सोलर पॅनल अज्ञात चोरट्यांनी पळवीले.

 छतावरील सोलर पॅनल अज्ञात चोरट्यांनी पळवीले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील धामोरी बुद्रुक येथील पोस्ट ऑफीस कार्यालया वरील सोलर पॅनल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नूकतीच उघडकीस आली. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


पांडुरंग तुकाराम वाडगे हे राहुरी तालूक्यातील धामोरी बुद्रुक येथील पोस्ट ऑफीस मध्ये शाखा पोस्ट मास्तर म्हणुन नोकरीस आहे. त्यांच्या पोस्ट ऑफीसच्या कार्यालया वरील ५ हजार रुपए किंमतीचे सोलर पॅनल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 


घटनेनंतर पांडुरंग तुकाराम वाडगे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ६४७/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.