सेकंड हॅण्ड मशिन देण्याचा बहाणा करून १५ लाख रूपयांना गंडा घातलाय.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सेकंड हॅण्ड लुम मशिन देण्याचा बहाणा करून राहुरी येथील अविनाश शिरसागर यांना पर प्रांतीय लोकांनी सुमारे १५ लाख रूपयांना गंडा घातल्याचे घटना नूकतीच उघड झाली. राहुरी पोलिस ठाण्यात पर प्रांतीय लोकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अविनाश प्रकाश क्षिरसागर, रा. राहुरी बुद्रुक, ता. राहुरी. हे मे. श्री ट्रेडर्स या फर्मचा प्रोप्रायटर आहे. सन २०२२ साली अविनाश शिरसागर यांनी श्री ट्रेडर्स या फर्मच्या नावाने नविन ओवन फर्टिलायझर बग निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले होते. सदर फॅक्टरीकरीता आवश्यक असणाऱ्या मशिनरी शोधत असतांना त्यांच्या फर्मचे मनेजर योगेश पोपट जाधव, रा. राहुरी बुद्रुक, ता. राहुरी. यांच्याकडे सदर जबाबदारी सोपविलेली होती.
त्या कामाकरीता त्यांना सेकंड हॅण्ड लुम मशिन हैद्राबाद येथे विक्रीस आहे, अशी माहिती मिळाली होती. सदर मशिनच्या खरेदी विक्री संदर्भातील मध्यस्थी व्यक्ती खाजा शेख रा. ए- आय. डी. ए. बालानगर, हैद्राबाद, तेलंगणा हे संपर्कात आले. खाजा शेख यांनी मी जुन्या औद्योगिक यंत्रांची खरेदी विक्रीत एजंट म्हणुन माझा भागीदार महमद इरफान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या बरोबर काम करत असतो असे सांगून भेटण्याकरीता हैद्राबाद येथे बोलावले.
अविनाश शिरसागर हे हैद्राबाद येथे गेले. त्यावेळेस खाजा शेख याने शेख नबी व शेख बशिर दोघे रा. शेख वली लेन, अल्लाउद्दीन कोटी, सनतनगर, बालानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, राज्य तेलंगणाढ यांचेकडे सेकंड हॅण्ड लुम मशिन विक्रीसाठी आहे, असे सांगून त्यांना बोलावून ओळख करून दिली. त्यानंतर वरील चौघांनी मशिन्स दाखविल्या. शेख नबी याने या मशिन्स माझ्या वैयक्तिक मालकीच्या आहेत. त्यामध्ये किरकोळ रिपेअरिंग बाकी आहे. ते करून तुम्हांला देऊ असे सांगितले.
त्यानंतर खाजा शेख, नबी शेख, बशीर शेख, महंमद इरफान हे सर्वजण शिरसागर यांच्या राहुरी येथील ऑफिसवर आले. व मशिनचा व्यवहार ठरला. इसार पोटी काही रक्कम त्यांना देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी वेग वेगळी कारणे सांगून आरोपींनी अविनाश शिरसागर यांच्याकडून १४ लाख ९५ हजार ५०० रूपये रूपये घेतले. मात्र मशिन पाठवीले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अविनाश प्रकाश शिरसागर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी खाजा शेख, रा. बालानगर, हैद्राबाद, तेलंगणा. नबी शेख व बशीर शेख दोघे रा. शेख वली लेन, अल्लाउद्दीन कोटी, सनतनगर, बालानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, राज्य तेलंगणा तसेच महमद इरफान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या चार पर प्रांतीय लोकांवर गुन्हा रजि. नं. ६४५/२०२३ भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
