Type Here to Get Search Results !

राहुरी - शाळेच्या खोलीचे गज कापून १७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला

 शाळेच्या खोलीचे गज कापून १७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे. 


राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी खोलीतील खुर्च्या, बेंच व पत्रे असा एकूण १७ हजार रुपए किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय. ही घटना दिनांक १३ जून २०२३ रोजी घडलीय. 


मंदा आण्णासाहेब शेळके, वय ५५ वर्षे, या राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत अंगणवाडी शिक्षीका म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १३ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मंदा शेळके या शाळेच्या स्टोअर रूम असलेली खोली बंद करून घरी गेल्या होत्या. दिनांक १४ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजता त्या शाळेत आल्या.


त्यावेळी त्यांना खोलीचे गज कापलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खोलीतील दोन झोके, दोन खुर्च्या, पाच बेंच व पंधरा पत्रे असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. घटनेनंतर मंदा शेळके यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ६४३/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.