शासनाच्या मालकीची माती चोरून वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील खडांबे शिवारात शासनाच्या मालकीची माती चोरून वाहतूक करत असताना एक ट्रक व एक ढंपर आढळून आला. पोलिस पथकाने कारवाई करून १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच दोघा जणांवर गुन्हा दाखल केलाय.
पोलिस नाईक गणेश रमेश लिपने वय ३७ वर्षे, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १३ जून २०२३ रोजी पाच वाजे दरम्यान राहुरी येथील पोलिस पथक बंदोबस्त करून वांबोरी कडून राहुरीकडे येत होते. तेव्हा त्यांना सडे गावातून खडांबेला जाणाऱ्या रोडवर एक ट्रक व एक ढंपर जाताना दिसला.
पोलिस पथकाने सदर दोन्ही वाहने थांबवून तपासली असता त्यामध्ये शिसनाच्या मालकीची माती चोरून वाहतूक केली जात होती. वाहन चालकांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिस पथकाने ट्रक क्रमांक एम. एच. १६ क्यु २७७५ तसेच डंपर क्रमांक एम. एच. ०६ ए सी १५५९ आणि सहा ब्रास माती असा एकूण १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
पोलिस नाईक गणेश रमेश लिपने यांच्या फिर्यादीवरून आरोपी तौसीफ हुसेन शेख, वय १८ वर्षे, रा. नांदगांव, ता. जि. अहमदनगर, ज्ञानदेव आंबादास डोळस, वय ४५ वर्षे, रा. सिंगवे नाईक, ता. जि. अहमदनगर यांचे विरुध्द भादंवि कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, पोलिस नाईक रविंद्र कांबळे, सचिन ताजने, सचिन लोंढे, अजिनाथ पाखरे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, भाऊसाहेब शिरसाट, जयदिप बडे यांनी केली.
