खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस ठाण्यावर आदिवासी समाजाचा मोर्चा.
गुन्ह्याचा सखोल तपास करून खऱ्या चोराचा तपास करून योग्य कारवाई करावी.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
चिंचाळे, ता. राहुरी येथील केबल चोरी प्रकरणात जाणीवपूर्वक, राजकीय द्वेषातून संशय घेऊन फिर्यादी अंबादास ढाकणे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात यावा. शेतकऱ्याच्या वारंवार केबल चोरून नेणाऱ्या खऱ्या चोराचा तपास करून योग्य कारवाई करावी. चींचाळा, गाडकवाडी, दरडगाव, परिसरातील शेतकऱ्यांना केबल व ईले मोटार चोरीच्या वारंवार होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. खोटे गुन्हे मागे घ्यावेत. या मागणी साठी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
चिंचाळे, ता. राहुरी येथे इले. मोटारीच्या केबल चोरी झाल्या प्रकरणी चिंचाळे येथील राजकीय पुढाऱ्यांनी दबाव टाकून अंबादास कोंडीराम ढाकणे या सवर्ण व्यक्तीच्या फिर्यादी नुसार संशयावरून विनाकारण १) परसराम रामदास जाधव व २) युवराज रामदास जाधव या अनुसूचित जमातीच्या आदिवासी व्यक्तींवर ३७९ भा.द. वि. अन्वये चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर फिर्याद ही पुर्णपणे खोटी असून राजकीय हेतूने प्रेरित होऊन दाखल केली आहे. कारण फिर्यादीच्या फिर्यादीनुसार केबल चोरी झाल्याची वेळ ही २० मे ते २२ मे अशी आहे. ते ठिकाण चिंचोळे शिवारातील बॅक वॉटर च्या परिसरातील आहे. दिनांक २६ मे रोजी गाडकवाडी शिवारातील बॅक वॉटर परिसरातील शेतकर्याची केबल चोरी झाल्याची घटना घडली.
सकाळी शेतकर्यांकडून परिसराची पाहणी झाली व तिथेच पाण्यात सदर केबली आढळून आल्या. शेतकर्यानीं रखवालदारा तर्फे तेथेच उपलब्ध असलेल्या होडीद्वारे केबल बाहेर काढल्या. व स्वताच्या केबली ओळखून आपआपल्या केबली ताब्यात घेतल्या. याच घटनेचे फोटो काढून केबल चोर सापडले. असा माध्यमावर प्रचार करून परसराम जाधव व युवराज जाधव या दोघांवर ३१ मे रोजी राजकीय दबावाखाली फिर्याद दाखल केली.
तरी या घटनेची सखोल चौकशी करून शेतकर्याच्यां वारंवार केबल चोरून नेणाऱ्या खऱ्या चोराचा तपास करून योग्य कारवाई करावी. चींचाळा, गाडकवाडी, दरडगाव, परिसरातील शेतकऱ्यांना केबल व ईले. मोटार चोरीच्या वारंवार होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. व खोटे गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी या वेळेस करण्यात आली.
मोर्चाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. संत गाडगबाबा आश्रम शाळेतून मोर्चाला ससुरुवात झाली. तर पोलीस स्टेशन राहुरी येथे सभेत रूपांतर झाले. मोर्चा समोर वंचित बहुजन आघाडी चे सचिव संदीप कोकाटे, ॲड. किरण विधाटे, उपसरपंच घमाजी जाधव, दगडु भले, ग्रामपंचायत सदस्य बापू गडधे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष वर्षाताई बाचकर, डॉ जालिंदर घिगे इत्यादींची भाषणे झाली.
किरण जाधव, संकेत कोरडे, शांताराम आंबेकर, सूरज पवार, कोंडिराम जाधव, किरण पवार, मच्छिंद्र दूधवडे, रघुनाथ बुळे, राजेंद्र जाधव, ऋषी टेंगळे, संजय गांगड, पारुबाई जाधव, लीलाबाई जाधव, इंदुबाई केदार, भोराबाई काळे, ठकुबाई काळे, भीमाबाई जाधव, कांताराम काळे, गेनुभाऊ जाधव, कुशाबा काळे, नाना काळे, अनिल काळे, सुनील केदार, राजू काळे, अजय जाधव, अक्षय जाधव, प्रशांत जाधव, दिनेश काळे, भारत जाधव, रमेश जाधव, खंडू जाधव, दत्तू काळे, नामदेव जाधव, रावसाहेब जाधव, शंकर पारधे, सुनील दोंदे, प्रवीण भुतांबरे, सागर दुधवडे, विश्वनाथ जाधव, हेमंत गांगड आदि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
