शाळा, महाविद्यालये, शासकीय निमशासकीय कार्यालयात आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा लावण्यात यावी.
सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात व दवाखाने येथे दर्शनी भागात साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा लावण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन आज सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले.
राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य सबंध महाराष्ट्र व जगभरात प्रसिध्द आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असणारे योगदान साहित्य व सामाजिक चळवळीतले असणारे अखंड योगदान पाहता महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी परिपत्रकाव्दारे शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे ऐतिहासिक कार्य नवीन पिढीला कायम स्वरुपी तेवत ठेवण्यासाठी, नविन पिढीच्या नजेरे समोर रहावे.
ज्या शिक्षणाच्या मंदीरातून देशातील थोर महापुरुषांचा इतिहास शिकविला जातो. त्या ज्ञान मंदीराच्या व शासकीय निम शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे.
परंतु सत्यशोधक लहुजी क्रांती सेना संघटनेचे कार्यकर्ते यांनी काही शाळा, महाविद्यालय, शासकीय निम शासकीय कार्यालये, दवाखाने या ठिकाणी समक्ष पाहणी केली असता जातीय व्देषभावनेतून त्या ठिकाणी असणारे कार्यालयीन प्रमुख मुख्याध्यापक यांनी सदर प्रतिमा लावलेली आढळून आली नाही. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांनी शासन परिपत्रक आदेशाची पायमल्ली होत आहे.
तरी शासन स्तरावरुन योग्य कार्यालयीन आदेश करुन संबंधितांना आदेश होऊन यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या आदेशाची प्रत १५ दिवसात संघटनेस प्राप्त न झाल्यास राहुरी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे आज दिनांक ८ जून २०२३ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे, बाबाजी जगधने दिपक आव्हाड, निलेश जगधने, प्रमोद ससाणे, बाबा अडागळे, निलेश पवार, रोहित जगधने, आनंद जगधने, विवेक जगधने, विवेक जोगदंड, आदित्य जगधने, अविश्कार जगधने, चंद्रकांत जगधने, सतिष भांड आदिंच्या सह्या आहेत.
