शेतीच्या कारणावरुन दोघा पती पत्नीने दोघा माय लेकाला शिवीगाळ करत लोखंडी पहारीने मारहाण केली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतीच्या वादाच्या कारणावरुन दोघा पती पत्नीने दोघा माय लेकाला शिवीगाळ करत लोखंडी पहारीने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील दरडगाव येथे दिनांक ७ जून २०२३ रोजी घडलीय.
कमलाबाई रेवन्नाथ काळे, वय ६० वर्षे, ही महिला तीच्या कुटुंबासह राहुरी तालूक्यातील दरडगाव येथे रहावयास आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाया भाऊसाहेब मुरलीधर काळे हा त्याच्या कुटुंबासह राहवयास आहे. शेतीत जाण्या येण्यावरुन तो नेहमीच कमलाबाई काळे यांना त्रास देतो.
दि. ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कमलाबाई काळे या त्यांच्या शेतीत जात असताना आरोपी भाऊसाहेब काळे व त्याची पत्नी भिमाबाई काळे हे दोघे तेथे आले व म्हणाले की, तुम्ही या शेतात जावायाचे नाही. त्या वेळेस कमलाबाई काळे त्याला म्हणाल्या की, ही शेती आमची आहे. तुझा या शेतीशी काहीही संबंध नाही.
असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने कमलाबाई काळे यांना शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पहारीने मारहाण केली. तेव्हा कमलाबाई काळे यांचा मुलगा योगेश हा भांडण सोडवीण्यास आला असता त्यालाही त्याने घाणघाण शिवीगाळ केली. तूम्हाला गाठुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर कमलाबाई रेवन्नाथ काळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब मुरलीधर काळे व त्याची पत्नी भिमाबाई भाऊसाहेब काळे, दोघे रा. दरडगाव, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ६२६/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
