महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले.
चोरीतील मुद्देमाल जप्त, पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक सुरू.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
झुंबरबाई नारायण खोसे, वय ६२ वर्षे, रा. माहेगाव, ता. राहुरी. या ७ जून २०२३ रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान राहुरी बस स्थानक येथून त्यांच्या घरी राहुरी तालूक्यातील माहेगाव येथे रिक्षामध्ये बसुन जात होत्या. या दरम्यान रिक्षा चालकाने त्यांची लूटमार केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.
७ जून २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील माहेगाव येथील झुंबरबाई नारायण खोसे या त्यांच्या घरी जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसून जात होत्या. रिक्षा चालकाने त्यांना पाण्याच्या टाकी पासून कॉलेज रोडने नेले. काॅलेज मागील कच्च्या रस्त्यावर रिक्षा थांबवली.
रिक्षा चालकाने महिलेला जबरदस्ती करून त्यांच्या जवळील रोख रक्कम व चांदीचे दागीने असा एकूण चार हजार रुपये किमंतीचा मुददेमाल घेऊन पसार झाला होता. त्यावेळी झुंबरबाई खोसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा रजि. नं. ६२४/२०२३ भादंवि कलम ३९२ प्रमाणे लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक ८ जून २०२३ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली. तेव्हा सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, राजेंद्र लोखंडे, पोलिस नाईक दिपक फुंदे, सचिन ताजने, आजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, नदिम शेख आदि पोलिस पथकाने राहुरी खुर्द परिसरात सापळा लावून रविंद्र सुभाष पाटील, वय ३२ वर्षे, रा. इरीगेशन कॉलनी संजीवनी वसाहत, राहुरी खुर्द.
यास त्याचेकडे असलेल्या रिक्षासह ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने झुंबरबाई खोसे यांची लूटमार केल्याची कबूली दिली. तसेच त्याच्याकडून चोरीतील रोख रक्क्म व सोन्याचे दागीने हस्तगत केले. सदर आरोपीवर यापूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१६/२०२३ भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.
