स्कॉर्पिओ गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. म्हणून विवाहित तरूणीचा छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
स्कॉर्पिओ गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी सासरच्या लोकां कडून २० वर्षीय विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आलाय. याबाबत सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्रियंका वैभव गोपाळे, वय २० वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी, हल्ली रा. कनगर, ता. राहुरी. या तरूणीचा विवाह बारागाव नांदूर येथील वैभव अनिल गोपाळे या तरूणा बरोबर ६ मे २०२२ रोजी झाला होता. लग्र झाल्यानंतर सुमारे १५ ते २० दिवस प्रियंका गोपाळे हिला सासरचे लोकांनी व्यवस्थित नांदवीले. त्यानंतर वैभव गोपाळे हा पत्नी प्रियंका गोपाळे हिच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करत होता.
तसेच माझे एका मुलीवर प्रेम आहे, मी तिच्या सोबत लग्र करणार आहे. असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होता. तसेच सासू मनिषा ही घरगुती कारणावरुन नेहमीच शिवीगाळ करत असते. तू माहेरहून काय आणलस असे म्हणुन मारहाण करते. सासरा अनिल गोपाळे हा जेवण व्यवस्थीत बनवले नाही, तुला काम येतच नाही. असे म्हणुन नेहमी शिविगाळ करतो.
त्यांनंतर पती वैभव हा पत्नी प्रियंका हिला म्हणाला की, मला स्कॉर्पिओ गाडी घ्यायची आहे. त्यामुळे तु तुझ्या माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये. तू पैसे आणले नाहीतर मी तुला राहु देणार नाही. असे म्हणुन प्रियंका हिला मानसीक व शारीरीक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन प्रियंका वैभव गोपाळे या विवाहित तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती- वैभव अनिल गोपाळे, सासू- मनिषा अनिल गोपाळ, सासरा- अनिल गंगाराम गोपाळे, सर्व रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ६३२/२०२३ भादंवि कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
