Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिस पथकाने जूगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कमेसह एकाला ताब्यात घेतले.

 पोलिस पथकाने जूगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कमेसह एकाला ताब्यात घेतले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील पोलिस पथकाने तालूक्यातील उंबरे गावच्या शिवारात दिनांक ८ जून २०२३ रोजी एका जूगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिस पथकाने मुद्देमालासह एका जूगा-याला ताब्यात घेतले. तर तीन जूगारी पसार झालेत. 


दि. ८ जून २०२३ रोजी सायंकाळी पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि, उंबरे गावाचे शिवारात एका पाटाचे कडेला लिंबाचे झाडाखाली काही इसम हे तिरट नावाचा जुगाराचा खेळ खेळत आहे.


अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पोलिस शिपाई सचिन विठ्ठल ताजणे, नदीम जाफर शेख, प्रमोद ढाकणे, दिपक फुंदे, रोहित पालवे, सम्राट गायकवाड आदि पोलिस पथकाने उंबरे गावच्या शिवारात सुरू असलेल्या जूगार अड्ड्यावर छापा टाकला. 


त्यावेळी पोलिस पथकाला एक इसम जागीच मिळुन आला. तर तीन इसम बाजुच्या गिन्नी गवतामध्ये पळुन गेले. पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग केला मात्र ते मिळुन आले नाही. पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विकास अरुण गायकवाड, वय ३२ वर्षे, रा. माळवाडी उंबरे, ता. राहुरी. असे असल्याचे सांगितले. तसेच पळून गेलेल्या तीघांची नावे त्याने सांगीतली. 


यावेळी पोलिस पथकाने जूगाराचे साहित्य व १ हजार १६० रूपयांची रोख रक्कम जप्त केली. पोलिस शिपाई सम्राट अशोक गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी विकास अरुण गायकवाड, पप्पु कनगरे, अमर मच्छिंद्र गायकवाड, भारत वैरागर, सर्व रा. माळवाडी, उंबरे, ता. राहुरी. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६३१/२०२३ भादंवि कलम १२ (अ), महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


या कारवाईत विकास अरुण गायकवाड याला जागीच ताब्यात घेतले असून इतर पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.