Type Here to Get Search Results !

राहुरी - भाऊ, भावजय व पुतण्या कडून संदिप गावडे यांना लाथा बूक्क्यांनी व बांबूने मारहाण.

 भाऊ, भावजय व पुतण्या कडून संदिप गावडे यांना लाथा बूक्क्यांनी व बांबूने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


गिनी गवतातून बैलगाडी का घातली. असे विचारल्याचा राग आल्याने भाऊ, भावजय व पुतण्या या तिघांनी मिळून संदिप गावडे यांना लाथा बूक्क्यांनी व बांबूने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील मल्हारवाडी येथे दिनांक ८ जून २०२३ रोजी घडलीय. 


संदिप गणपत गावडे, वय ४२ वर्षे, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी. हे दि. ८ जून २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेळ्याच्या गोठ्यात असताना तेथे आरोपी त्यांचा भाऊ, भावजय व पुतण्या हे तिघेजण आले. आदल्या दिवशी संदिप गावडे यांनी आरोपींना विचारले होते कि, तुम्ही गिनी गवतातून बैलगाडी का घातली.


असे विचारल्याचा राग धरुन आरोपींनी संदिप गावडे यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्कयाने व बांबूने मारहाण केली. तसेच तू आमच्या नादी लागला तर कोयताने तोडीन, अशी धमकी दिली आहे. घटनेनंतर संदिप गणपत गावडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊ- दिपक गणपत गावडे, पुतण्या- रोहित दिपक गावडे, भावजाई- छाया दिपक गावडे तिघे रा. मल्हारवाडी, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ६३०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.