Type Here to Get Search Results !

राहुरी - बियरची बाटली डोक्यात मारल्याने तरूण जखमी. एक जणांवर गुन्हा दाखल.

 बियरची बाटली डोक्यात मारल्याने तरूण जखमी. एक जणांवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील गडदे आखाडा येथील हॉटेल आराम येथे नवनाथ थोरात या तरूणाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून मारहाण करण्यात आली. ही घटना दिनांक ३ जून रोजी घडलीय. 


अक्षय आण्णा बाचकर वय २५ वर्षे, रा. गडधे आखाडा, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३ जून २०२३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अक्षय बाचकर यास आराम हॉटेलचे मालक बाबुराव गुंजाळ यांनी फोन करुन सांगीतले की, तुझा मावस भाऊ नवनाथ साहेबराव थोरात यास शिवाजी लालचंद गडधे रा. गडधे आखाडा ता. राहुरी हा आराम हॉटेलमध्ये मारहाण करत आहे. 


अक्षय बाचकर हा ताबडतोब आराम हाॅटेल येथे गेला असता तेथे त्याचा मावस भाऊ नवनाथ याला खाली पाडुन शिवाजी लालचंद गडदे हा बीअरचे बाटलीने त्याच्या डोक्यात मारहाण करत होता. त्यांना पाहुन तो तेथुन पळुन गेला. तेव्हा नवनाथ थोरात याला मारहाण झाल्याने रक्तस्त्राव होऊन तो बेशुध्द पडला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे घेवुन गेले. तेथील डक्टरांनी त्यास पुढील उपचार कामी सीव्हील हस्पीटल अ. नगर येथे पाठवले. 


अक्षय आण्णा बाचकर याच्या फिर्यादीवरून आरोपी आरोपी शिवाजी लालचंद गडधे रा. गडधे आखाडा ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ६१३/२०२३ भादंवि कलम ३२४ प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.