शिळे पाणी ओतून दिले म्हणून सासू, जाव व दिराकडून लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
हंड्यामधील शिळे पाणी ओतून दिले म्हणून सासू, जाव व दिराने शितल पवार या विवाहित महिलेला लाथा बूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे दिनांक ३ जून २०२३ रोजी घडलीय.
शितल अमोल पवार, वय ३० वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने शितल पवार यांनी घरा समोरील नळावर पाणी भरताना हंड्यामधील शिळे पाणी ओतून दिले. त्याचा राग आल्याने त्यांची जाव म्हणाली तू हंड्याला हात का लावला.
असे म्हणून शिवीगाळ करणेस सुरवात केली. सासु शोभा हीने देखील त्यांना शिवीगाळ करणेस सुरवात करुन हंड्यामधील पाणी मी सकाळीच भरुन ठेवले होते तु ते का ओतुन दिले. असे म्हणाली. तेव्हा शितल पवार या म्हणाल्या कि, मी माहेरहून आजच आल्याने मला माहीत नव्हते. त्यामुळे मी पाणी ओतुन दिले. तुम्ही मला त्यावरुन शिवीगाळ करु नका.
असे म्हणाले असता त्यांची जाव स्मीता हीस राग आल्याने तिने मला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच त्यांचा दिर विलास हाही तेथे आला आणि शिवीगाळ करणेस सुरवात करुन त्याने शितल पवार यांना लोखंडी गजाने मारहाण केली.
तसेच तू इथे राहु नकोस, तू तुझे माहेरी निघुन जा. तु तुझे माहेरी गेली नाहीस तर तुला मारुन टाकु अशी धमकी दिली. घटनेनंतर शितल अमोल पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी आरोपी स्मिता विलास पवार, शोभा अशोक पवार, विलास अशोक पवार तीघे रा. डिग्रस, ता. राहुरी.
या तिघांवर गुन्हा रजि. नं. ६१०/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
.jpeg)