बिड जिल्ह्यातील मुलाने राहुरी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना दिनांक ५ जून २०२३ रोजी उघडकीस आली. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात मंगेश कुलदिप या तरूणावर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेतील १६ वर्षे ५ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी मुळची बिड जिल्ह्यातील आष्टी तालूक्यातील आहे. सध्या ती राहुरी शहरातील तनपूरे वाडी रोड परिसरात तीच्या मामाकडे राहत होती.
दिनांक ५ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान ती मुलगी घरात कोणाला काही न सांगता निघून गेली. तीच्या नातेवाईकांनी परिसरात तीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. आरोपीने मुलीचे अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर अखेर तीच्या मामाने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी मंगेश वैष्णव कुलदीप, रा. आष्टी, ता. आष्टी जि. बीड. याच्या विरोधात संशयीत आरोपी म्हणून गुन्हा रजि. नं. ६१८/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण खंडागळे हे करीत आहेत.
