Type Here to Get Search Results !

राहुरी - महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढताना भामट्याला रंगेहाथ पकडले.

 महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढताना भामट्याला रंगेहाथ पकडले.





राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घरा समोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडताना एका भामट्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राहुरी शहरातील मुलनमाथा येथे दिनांक १६ जून २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडलीय. 


वैभव प्रभाकर कदम, वय ३४ वर्षे, हे राहुरी शहरातील मुलनमाथा येथे रहावयास असून चहाचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक १५ जून २०२३ रोजी रात्री वैभव कदम व त्यांच्या घरातील इतर लोक घरा समोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. 


दि. १६ जून २०२३ रोजी पहाटे दोन वाजे दरम्यान एका भामट्याने वैभव कदम यांच्या आईच्या गळयातील १० हजार रुपए किंमतीची सोन्याची पोत तोडून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वैभव कदम यांच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी वैभव कदम व त्यांच्या भावाने त्या भामट्याला जागेवरच पकडले. नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला ताबडतोब गजाआड केले. 


वैभव प्रभाकर कदम यांच्या फिर्यादीवरून सतिष भगवान धोत्रे, वय २५ वर्षे, रा. लोहार गल्ली, राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ६४९/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.