Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिस पथकाने कारवाई करून एकाला ताब्यात घेऊन मावा जप्त केला.

 पोलिस पथकाने कारवाई करून एकाला ताब्यात घेऊन मावा जप्त केला.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे पोलिस पथकाने दिनांक १६ जून २०२३ रोजी एका पान टपरीवर छापा टाकून १ हजार ३५० रूपयांचा मावा जप्त केलाय. तसेच एका जणाला ताब्यात घेवून गजाआड केले. 


पोलिस नाईक गोवर्धन आंबादास कदम यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १६ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.१५ वाजे दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत बऱ्हाटे, पोलिस नाईक सचिन ताजणे, गोवर्धन कदम, ढाकणे आदि पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे छापा टाकला. 


तेव्हा ब्राम्हणी येथील विरभद्र मंदिरा जवळील शनिराज पान सेंटर येथे एक इसम अवैद्य रित्या त्याच्या टपरीमध्ये मावा विक्री करताना दिसून आला. त्याच्या पान टपरीची झडती घेतली असता त्या ठिकाणी १ हजार ३५० रूपये किंमतीचा ७५० ग्रॅम मावा असल्याचे दिसले. पथकाने मावा व आरोपीला ताब्यात घेतले. 


पोलिस नाईक गोवर्धन आंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर दामोधर सरोदे, वय ३२ वर्षे, रा. धनगर गल्ली, ब्राम्हणी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ६५०/२०२३ भादंवि कलम १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.