हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा लाभ नागरिकांनी घ्या- देवेंद्र लांबे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथे आज सोमवार दि.२६ जून २०२३ रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधत हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे शुभारंभ राहुरी येथे करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ रोजी राज्यातील गोरगरीब जनतेचा आरोग्य प्रश्न सुटावा म्हणून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हि योजना कार्यान्वित केली आहे. या दवाखान्यात सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणी, औषधे, रक्ताच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जयवंत पवार, शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, आरडगावचे मा. सरपंच कर्णा जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याचे कृतीशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सर्वसामन्य नागरिकांना केंद्र बिंदू मानून विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासकीय कामे केली जात आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या योजनाचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासकीय कर्मचाऱ्याच्या बरोबरीने शिवदूत काम करत आहेत. राहुरी मध्ये ग्रामीण रुग्नालयाची सुसज्ज इमारत नसल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण होती. परंतु आपला दवाखाना राहुरीत सुरु झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा लाभ घ्यावा असे देवेंद्र लांबे म्हणाले.
या प्रसंगी आपला दवाखाना विषयी माहिती देतांना डॉ. नम्रता मुकणे म्हणाल्या कि, या दवाखान्यात सर्व प्रकारच्या आरोग्य सविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपला दवाखाना येथे मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे व सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. हा दवाखाना दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
या कार्यक्रमास अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, महेंद्र शेळके, रोहित नालकर, नानासाहेब काचोळे, मिलिंद हरिश्चंद्रे, राजेंद्र लबडे, सतीष घुले, अनिल पेरणे, ज्ञानेश्वर सप्रे, वसंत कदम, दत्तात्रय अडसुरे, दादासाहेब खाडे, अंकुश पवार, बाळासाहेब कदम, अशोक तुपे, बापूसाहेब काळे, आरोग्य विभागाचे डॉ. मधुलक्ष्मी बेरड, संदीप कल्हापुरे, किरण शिंदे, हर्शल झांबरे, गौरव जाधव, प्रसाद तांबे, देशमुख, घनशाम कळसाइत, राहुल कोतकर आदी उपस्थित होते. पंचायत समितीचे आरोग्यदूत किरण खेसमाळस्कर यांनी आभार मानले.
हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन सर्व सामान्य नागरिक रामभाऊ गुंजाळ यांच्या हस्ते करून शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी शिवसेना भाजप हे सरकार सर्व सामन्य जनतेचे आहे. हे या कृतीतून दाखवून दिले.त्यांच्या या कृतीमुळे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
--
