एल.आय.सी. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून अजिंक्य शिंदेंची निवड
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य (बच्चू) शिंदे यांची एल आय सी च्या डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून निवड झाली. अधिकारीच व्हायच या भावनेतून त्यांनी रात्रन दिवस एक करून प्रयत्नांची पराकाष्ठा करून अथक परिश्रम घेतले.
अधिकारी व्हायचंच हे ध्येय उराशी बाळगून अजिंक्य (बच्चू) शिंदे यांनी खूप अभ्यास करून यात यश मिळवले. या यशात त्यांचे आई, वडिल यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या या यशाबद्दल रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा स्नेहल सांगळे, वंचितचे
तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, सा. भडकत्या ज्वाला चे संपादक निसारभाई सय्यद, दैनिक सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे, संजय संसारे, योगेश साळवे, सागर साळवे, संतोष दाभाडे, रवी पलघडमल, गौतम साळवे, भूषण साळवे, प्रमोद भागवत आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
