काॅलेज तरूणीचे सिने स्टाईल ने मोटारसायकलवरून अपहरण.
नातेवाईकांनी पाठलाग केला परंतू आरोपी तरूणीला घेऊन सुसाट वेगाने पसार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील तांभेरे परिसरात एका अल्पवयीन काॅलेज तरूणीचे दोन तरूणांनी सिने स्टाईलने अपहरण करून तीला मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. दरम्यान तरूणीच्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केला. परंतू तरूणांनी मोटरसायकल सुसाट वेगात चालवून तरूणीला पळवीले. ही घटना दिनांक २५ जून २०२३ रोजी घडलीय.
या घटनेतील १५ वर्षे १० महिने वय असलेली अल्पवयीन तरूणी ही अकरावी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिनांक २५ जून २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजे दरम्यान ती काॅलेज तरूणी तीच्या घरा जवळ असलेल्या चौकात उभी होती. त्यावेळी एका मोटार सायकलवर दोन अनोळखी तरूण तेथे आले. त्यांनी तरूणीला त्यांच्या मोटारसायकवर बसवुन पळवून नेले.
त्यानंतर त्या तरूणीच्या वडिलांनी व इतर नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा ते भरधाव वेगात निघून गेले. घटनेनंतर दुपारी तरूणीचे वडिल मुलीचे अपहरण झाले बाबतची तक्रार देण्यासाठी राहुरी पोलीस आले. तेव्हा एका नातेवाईकांनी त्यांना फोन करून सांगीतले कि, तूमची मुलगी निर्मळ पिंपरी ता. राहता.
येथील बायपास चौकात आरोपी गौरव विश्वनाथ लबडे, रा. शिंदे वस्ती, कोल्हार बु. व अमोल संतोष बेलकर, रा. बेलकर वस्ती तांभेरे, ता. राहुरी यांच्या ताब्यात त्यांच्या मोटरसायकलवर जाताना मिळून आली. तेव्हा तीचे वडील तात्काळ निर्मळ पिंपरी, ता. राहता, येथे गेले. त्या ठिकाणी सदर दोन तरूणांसह ती तरूणी मिळून आली.
त्यानंतर लोणी पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरूणीला तीच्या वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन आरोपी गौरव विश्वनाथ लबडे, रा. शिंदे वस्ती, कोल्हार बु. व अमोल संतोष बेलकर, रा. बेलकर वस्ती, तांभेरे, ता. राहुरी. या दोघां विरोधात गुन्हा रजि. नं. ७००/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गुन्हा दाखल केलाय.
