Type Here to Get Search Results !

राहुरी - दिराकडून भावजयला लाकडी दांड्याने मारहाण.

 दिराकडून भावजयला लाकडी दांड्याने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मोटरसायकल दुरूस्तीचा खर्च देण्याच्या कारणावरुन दिराने भावजयला लाकडी दांड्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पारनेर तालूक्यातील तास येथे घडली असून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


सुरेखा पांडुरंग बाचकर, वय ३२ वर्षे, या पारनेर तालूक्यातील तास येथे राहत असून त्यांचे माहेर राहुरी येथील आहे. दि. २१ जून २०२३ रोजी साय. ७ वा. चे सुमारास सुरेखा बाचकर व त्यांच्या सासूची मोटारसायकल बाबत बोलणी चालू होती. त्या सासूला म्हणाल्या की, तुम्ही मोटारसायकलचा अर्धा खर्च द्या. असे म्हणाली. त्यावर सुरेखा बाचकर म्हणाल्या कि, आम्ही गाडी वापरत नाही. आम्ही खर्च देणार नाही.


असे म्हणाल्याचा राग आल्याने सुरेखा बाचकर यांचा दिर नानासाहेब भागवत बाचकर याने सुरेखा बाचकर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर सुरेखा पांडुरंग बाचकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. 


त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब भागवत बाचकर रा. तास, ता. पारनेर याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. ६८१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.