Type Here to Get Search Results !

राहुरी - लग्नाच्या काही तास अगोदर नवरी मुलगी प्रियकरा सोबत सैराट.

 लग्नाच्या काही तास अगोदर नवरी मुलगी प्रियकरा सोबत सैराट.



वऱ्हाडी मंडळींनी डोक्याला हाथ लावून मनस्ताप व्यक्त केला.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


प्रेम हे आंधळ असतं असे म्हणतात तेच खरं, प्रेमामध्ये पडलेले तरुण तरुणी यांना जगाचे काही घेणं देणं नसल्यासारखे ते त्यांच्या मनात येईल तोच निर्णय घेतात. अशाच प्रकारे राहुरी शहरातील एक १९ वर्षीय तरुणी लग्नाच्या अवघ्या काही तास अगोदर आपल्या प्रियकरा सोबत सैराट झाल्याची घटना घडली.

          राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोड येथे असलेल्या साई लॉन्स परिसरातील एका १९ वर्षीय तरुणीचे आणि राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील एका तरुणाचे गेल्या काही वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते. सुमारे एक वर्षांपूर्वी ते जोडपे सैराट झाले होते. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना परत आणले होते. त्यानंतरही त्यांचे प्रेम संबंध सुरूच होते. त्या १९ वर्षीय तरुणीचा विवाह शिर्डी येथील एका तरुणाशी जमला होता. आज दिनांक ३० जून रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान तीचे लग्न लागणार होते. शिर्डी येथील नवरदेवा सह वऱ्हाडी मंडळी सकाळीच राहुरी येथील नवरीच्या दारात येऊन बसले होते. लग्न घटीका जवळ येत असताना नवरी मुलगी गायब झाल्याचे समजले. नवरी मुलीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेऊन माहिती घेतली असता त्यांना समजले कि, नवरी मुलगी ही तीच्या प्रियकरा सोबत सैराट झाली. 

         तेव्हा नवरदेवाकडील लोकांनी सांगीतले कि, नवरी मुलीला लवकर घेऊन येत असाल तर आम्ही लग्न लावून नवरीला घेऊन जायला तयार आहोत. तेव्हा नवरी मुलीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर सर्वांनीच डोक्याला हाथ लावून मनस्ताप व्यक्त केलाय.