Type Here to Get Search Results !

राहुरी - शहरात विदेशी दारूची चोरून विक्री करणारा गजाआड.

 शहरात विदेशी दारूची चोरून विक्री करणारा गजाआड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरातील शनीचौक परिसरात विदेशी दारू चोरून विक्री करत असताना एका जणाला राहुरी पोलिस पथकाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. ही कारवाई दिनांक १३ जुलै २०२३ रोजी करण्यात आली. पकडलेल्या आरोपीकडून विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 


राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानूसार दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान पोलिस नाईक जयदिप बडे, शेळके, नागरगोजे आदि पोलिस पथकाने राहुरी शहरातील शनीचौक परिसरात छापा टाकला. 


त्यावेळी एक इसम एका टपरीच्या आडोशाला विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करत असताना आढळून आला. पोलिस पथकाने त्याला जागेवरच रंगेहाथ पकडले. त्यावेळी त्याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. 


पोलिस नाईक जयदिप शिवनाथ बडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश साहेबराव दिवे, वय ३२ वर्षे, रा. कनगर, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ७७४/२०२३ भादंवि कलम ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.