Type Here to Get Search Results !

राहुरी - वाळू तस्करीवर कारवाई करून सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 वाळू तस्करीवर कारवाई करून सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलिस पथकाने दिनांक १२ जुलै २०२३ रोजी तालूक्यातील तांदूळवाडी परिसरात मुळा नदीपात्रात छापा टाकलाय. यावेळी एक जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टर असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून तीन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केलाय. 


राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून त्यांनी ताबडतोब पोलिस नाईक प्रभाकर शिरसाठ, सचिन ताजणे, नदिम शेख, सागर नवले, नागरगोजे आदि पोलिस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. 


त्यानूसार सदर पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील तांदूळवाडी परिसरातील मुळा नदीपात्रात दिनांक १२ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या दरम्यान छापा टाकला. त्यावेळी तेथे मुळा नदीपात्रात काही आरोपी एक जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टर मधून शासनाच्या मालकीची वाळू चोरून नेत असताना दिसून आले. 


पोलिस पथकाने छापा टाकताच तीन अनोळखी इसम पसार झाले. यावेळी पथकाने एक जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टर असा एकूण १७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलाय. 


पोलिस नाईक सागर नवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ७७३/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.