Type Here to Get Search Results !

राहुरी - दोन अल्पवयीन बहिनींचे एकाच वेळी राहत्या घरातून अपहरण.

 दोन अल्पवयीन बहिनींचे एकाच वेळी राहत्या घरातून अपहरण.



राहुरी प्रतिनिधी - मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरातून अल्पवयीन असलेल्या दोन सख्या बहिणींचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना दिनांक १३ जुलै २०२३ रोजी घडलीय. 


या घटनेतील एक महिला राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात राहत असून त्यांना एक १६ वर्षे ११ महिने व दूसरी एक १५ वर्षीय अशा दोन मूली आहेत. त्या शिक्षण घेत आहेत. 


दि. १३ जुलै २०२३ रोजी सकाळी ६ वा. चे सुमारास सदर दोन मुली व त्यांची आई घरात असताना मुली घरा बाहेर बसल्या होत्या. काही वेळाने त्यांची आई घराबाहेर आल्या असता सदर दोन्ही मुली बेपत्ता झाल्या होत्या. 


मुलींच्या आईने आपल्या मुलींचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. सदर मुलींच्या आईची खात्री झाली की, त्यांच्या दोन मुली घरात झालेल्या वादामुळे घरातुन निघुन गेल्या आहेत. किंवा त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवून नेले आहे. 


त्यानंतर सदर मुलींच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार अज्ञात इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. ७७२/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.