Type Here to Get Search Results !

राहुरी - शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्त्या दुभाजकाचे काम तात्काळ थांबवा- देवेंद्र लांबे.

 शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्त्या दुभाजकाचे काम तात्काळ थांबवा- देवेंद्र लांबे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्त्या नाका नं. ५ पर्यंत रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्ण होवून रस्त्याच्या मधोमद रस्ता दुभाजक तयार करण्याचे काम चालू आहे. ते तात्काळ थांबविण्याची मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अहमदनगर येथे  सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेत केली आहे.  


 यावेळी शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सांगितले कि, रस्ता दुभाजकाची रुंदी जास्त असल्या कारणाने एका वेळी रस्त्यावरून एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. रस्त्याच्या कडेला भराव नसल्या कारणाने मोठे वाहन रस्त्यावरून मागून आल्यास दुचाकी वाहन चालकाचा किंवा पाई चालणाऱ्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. 


रस्ता दुभाजकाची उंची जास्त प्रमाणात असल्या कारणाने वाहन धारक रस्ता ओलांडताना अपघात होऊ शकतो. पाण्याची टाकी ते नाका नं. ५ या रस्त्याच्या कडेला अनेक व्यावसायिकांचे दुकाने आहेत. रस्ता दुभाजकामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होणार आहे. या रस्त्याची उंची व नागरिकांचे घरे, दुकाने यांची उंची लक्षात न घेतल्यामुळे मोठ्या प्रमणात पाऊस झाल्यास अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


 सर्वसामन्य नागरिक, व्यावसायिक, वाहन चालक यांचा हिताचा निर्णय घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्ता नाका नं. ५ वरील रस्ता दुभाजक बनविण्याचे काम तात्काळ थाबवून रस्त्याच्या कडेला भराव टाकावा व सांडपाणी, अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही. या कामी उपाय योजना करण्याची मागणी देवेंद्र लांबे यांनी केली आहे.


मागणीवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास  राहुरी शहरातील पाण्याची टाकी ते स्टेशन रस्त्या नाका नं. ५ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची अथवा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांचे, नागरिकांचे काही नुकसान अथवा अपघात झाल्यास उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, राहुरी यांना दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली जाईल. असे शिवसेना राहुरी  तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्राद्वारे कळविले आहे.


या प्रसंगी ता. संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, उपाध्यक्ष प्रशांत खाळेकर, ता. संघटक महेंद्र उगले, नितीन पटारे, दादासाहेब बडाख, संभाजी निमसे, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते.


 राहुरी शहरातील डॉ. खुरुद हॉस्पिटल ते अग्निशामन दल इमारत पर्यंत रस्ता दुभाजक करू नये. अशी मागणी राहुरी नगरपरिषदेकडे १६ मार्च २०२१ ला करण्यात आली होती. परंतु मागणीकडे दुर्लक्ष करत रा.न.पा. चे अभियंता यांनी  मनमानी कारभार करत रस्ता दुभाजक केला. परंतु केलेला रस्ता दुभाजकामुळे मोठी अडचण निर्माण झाल्यामुळे केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. आता पुन्हा रस्त्याची उंची वाढविण्यासाठी अधिक निधी खर्च होणार आहे. -  देवेंद्र लांबे.