Type Here to Get Search Results !

राहुरी‌ - जूगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

 जूगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त.



प्रतिष्ठित घरातील सहा जूगारी गजाआड तर तीन जूगारी पसार.


राहुरी‌ प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील हाॅटेल सातबारा येथील शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर राहुरी पोलीस पथकाने छापा टाकून प्रतिष्ठित घरातील जूगारी पकडले. या कारवाईत जुगाऱ्यांकडुन चारचाकी दोन वाहने व दुचाकी पाच वाहने पकडली आहे. तर तिन जुगारी अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना दि. २९ जुन २०२३ रोजी रात्री १२ वाजे दरम्यान घडली आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यामधे चांगलीच खळबळ उडाली आहे.


या कारवाईत पोलिस पथकाने जुगाऱ्याकडुन सुमारे १२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल व‌‌ रोख रक्कम जप्त केली आहे. या बाबत हवालदार प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७१३/२०२३ महाराष्ट्र  जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


या कारवाईत १)अनिल चंद्रभान ओहळ, वय ३० वर्षे, रा. गुहा ता. राहुरी. २) गणेश बाळासाहेब वरखडे, वय ३५ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता .राहुरी. ३) अजय रामराव जाधव, वय ४० वर्षे, रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी. ४) बाबा निवृत्ती अढागळे, वय ४२ वर्षे, रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी. ५) राजेंद्र हिरामन गुंजाळ, वय ३६ वर्षे, रा. लोहार गल्ली, राहुरी. ६) अजय गोरख बर्डे, रा. एकलव्य वसाहत, राहुरी. या जूगा-यांना पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. 


तर ७) सचिन मनोहर बर्डे, रा. एकलव्य वसाहत, राहुरी. ८) खाँजा करिम शेख, रा. देवळाली प्रवरा, ९) पिंटु थोरात, रा. देवळाली प्रवरा (पूर्ण नाव माहीत नाही) हे जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत. 


दि. २९ जुन २०२३ रोजी रात्री १२ वाजे दरम्यान गुहा गावच्या शिवारातील गुहा ते तांभरे जाणारे रोडवरील सात बारा हॉटेलच्या पाठीमागे पत्राच्या शेड मध्ये जूगार खेळत असल्याची खबर गुप्त बातमीदारा मार्फत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळाली. तेव्हा सहाय्यक‌ पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा, पोलिस नाईक सचिन ताजने, गणेश लिपने, भाऊसाहेब सिरसाट, प्रमोद ढाकणे आदि पोलिस पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.