पोलिस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा, आठ जुगारी गजाआड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर राहुरी पोलिस पथकाने दिनांक ८ जुलै रोजी छापा टाकला. त्यावेळी पथकाने जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करून आठ जुगाऱ्यांना गजाआड केले.
दिनांक ८ जुलै २०२३ रोजी दुपारी अडिच वाजे दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून राहुरी पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथे छापा टाकला त्यावेळी तेथे काही जुगारी तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळताना आढळून आले. तेव्हा पोलिस पथकाने रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.
तसेच जुगार खेळणारे सखाराम तुकाराम जाधव (वय ४४ वर्षे), नन्नू फकीर पठाण (वय ४२ वर्षे), केशव मुंजाबा पेरणे (वय ५१ वर्षे), भारत दामोधर मोरे (वय ५६ वर्षे), लक्ष्मण दादा पेरणे (वय ६३ वर्षे, पाचही जण रा. तांदुळवाडी) तसेच बादल गोविंद शिंदे (वय ५२ वर्षे, रा. राहुरी रेल्वे स्टेशन), भास्कर बाबुराव हिवाळे (वय ५७ वर्षे, रा. कोंढवड), लक्ष्मण पवार (वय ३२, वर्षे रा. डिग्रस) या आठ जणांना ताब्यात घेऊन गजाआड केले.
पोलिस नाईक जयदीप बडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सदर आठ जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय.
