राहुरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. अनिता वेताळ - अंत्रे
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. अनिता वेताळ- अंत्रे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील मुळ निवासी असलेल्या डॉ. वेताळ ह्या राहुरी महाविद्यालयात गेल्या पंचवीस वर्षापासून प्राध्यापिका म्हणुन सेवेत आहेत.
अभ्यासु, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, संशोधक म्हणुन त्यांचा परिसरात चांगला लौकिक आहे. अध्यापना शिवाय त्यांचा संशोधन क्षेत्रात ही ठसा आहे. हिंदी विषयात पीएच. डी साठीचे संशोधन त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी घेत आहेत.
तसेच राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित संस्था च्या त्या सदस्य असून नुकत्याच १० जानेवारी २०२३ रोजी मॉरिशस येथे तर १२ जून २०२२ रोजी काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय परिषदे मध्ये त्यांनी आपल्या शोधनिबंधचे वाचन केले आहे. विनोबा भावे यांच्या सदप्रेरणेने स्थापन झालेल्या नवी दिल्ली येथील नागरीलिपि परिषद व उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथील विश्व हिंदी सेवा संस्थानच्या त्या सक्रिय आजीवन सदस्य आहेत.
प्राचार्य डॉ. अंत्रे यांनी आपल्या नियुक्ती बद्दल समाधान व्यक्त केले आहे. या निवडी बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक खासदार डॉ. सुजय विखे, सर्व संचालक मंडळ तसेच संस्थचे सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी प्रकाश सैदाणे, महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी, कार्यालयीन अधिक्षक विठ्ठल लांबे
तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक, कर्मचारी वृन्द, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी कार्यालयीन अधिक्षक विठ्ठल लांबे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक, कर्मचारी वृन्द, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
