Type Here to Get Search Results !

राहुरी - संजय जंगम यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक यथोचित सत्कार.

 संजय जंगम यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक यथोचित सत्कार.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेचे मुख्य लिपिक संजय जंगम हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचे विविध मान्यवरांच्या वतीने सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. निरोप समारंभाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 



यावेळी विद्यामंदिर प्रशालेचे माजी प्राचार्य दगडू मिस्तरी,  माजी प्राचार्य सयाजी शिंदे, सेक्रेटरी मनोज बिहाणी यांनी आपल्या भाषणात संजय जंगम यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रसंशा करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी सेवा निवृत्ती निमित्त भाषणे केली.


या कार्यक्रमास राहुरी नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार, स्कूल कमेटी अध्यक्षा सुशीला बिहाणी, सदस्या, रिता बिहाणी, उप मुख्याध्यापिका मंजेरी देशपांडे, पत्रकार सुनील भूजाडी, राजू शेटे, रोहीत स्वामी, दत्तात्रय स्वामी,  प्रशांत स्वामी, मनोजस्वामी जंगम, राजेद्र पागीरे, अशोक जंगम सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, गोल्डन ग्रुप सर्व सदस्य, मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय जंगम यांचा सपत्नीक सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रा.संजय भडके, युवराज भोसले, धनंजय गिरी, प्रा. एम. डी. जाधव यांनी सुत्रसंचलन केले. आभार कल्पेश जंगम यानी मानले.